देवळी पोलिसांची दोन अवैध दारू विक्रीच्या ठिकाणावर रेड
पाच आरोपीवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि.31/02/2026 रोजी गोपनीय माहीती मिळाली की, देवळी येथील पुलगाव चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्पलेक्स जवळ खुशाल रामरावजी कमुरे रा. देवळी व निशांत किरण भगत हे अवैध दारू विकीचा गुत्ता चालवत आहेत व विक्री करीत आहेत. अशा माहीतीवरून प्रभारी अधिकारी स.पो.नी संदीप कापडे यांचे मार्गदर्शनात पोउपनि शिवराज जाधव सह पोउपनि कल्पेश मगरे, पोशी मनिष कांबळे पाहेवा नितीन तोडासे यांनी त्याचे वर रेड करून सदर दारू विकत्याकडून ओशी ब्लू कंपनीची 4800 रूपयाची इंग्लीश दारू तसेच देशी गोवा संत्रा कंपनीची 2700 रूपयाची दारू व विकी साठी ठेवलेले टेबल, खूर्ची किंतम 7500 रू त्याचे कडून नगदी 3000 रूपये व दोन मोबाईल किंमत 20000 रूपये असा 41000 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच देवळी शहरातील एमआयडीसी गेट जवळी पानटपरीवर भिमा म्हैसकर, अंनता आत्राम व दिनेश नागोसे यांचेवर दारूसंबंधाने रेड करून दारू व दारू विकीचे साहीत्य, मोबाईल असे 19000 रूपयाचा गाल जप्त करण्यात आला आहे. असा एकूण 60000 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर पाचही आरोपीवर दारू बंदी कायदयान्वये पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले मॅडम पुलगाव यांचे मार्गदर्शनाखाली देवळी पोलीस स्टेशन प्रभारी ठाणेदार श्री संदीप कापडे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि शिवराज जाधव सह पोउपनि कल्पेश मगरे, पोशी मनिष कांबळे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन देवळी यांनी केली.



