आठवडी बाजारात अवैध वसुलीचा आरोप, ठेकेदारावर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत आठवडी बाजारात विक्रेत्यांकडून नियमानुसार निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात मोहम्मद समीर या व्यापार्याने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ते दर रविवारी आठवडी बाजारात दुकान लावतात. मात्र ठेकेदार त्यांच्याकडून ₹१५० ते ₹८० पर्यंत शुल्क वसूल करत आहे, जे पूर्णतः अवैध आहे. नियमानुसार ठरवलेले शुल्क फक्त ₹३० असून त्याचा फलक देखील बाजारात लावलेला आहे.
मोहम्मद समीर यांनी या अवैध वसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर इतर व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सहमती दर्शविणाऱ्यांमध्ये पुढील व्यापाऱ्यांचा समावेश आहे :
मोहम्मद समीर अब्दुल वहाब
मोहम्मद खान मिया खान
सचिन देवराव डोके
अन्सार खान
या तक्रारीनंतर आता नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांना न्याय द्यावा.