ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या मार्गी लावा

अन्यथा २० जुलैला मोर्चा – सीनियर सिटिझन आधार संस्था

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आणि घुग्घुस शहरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बहुउद्देशीय सीनियर सिटिझन आधार संस्था, घुग्घुसने आता थेट मोर्चाच उभारण्याचा इशारा दिला आहे. संस्थेने दिनांक २० जुलै रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून, त्याआधी संबंधित सर्व यंत्रणांना निवेदन दिले आहे.

वेकोली निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या – व्यवस्थापनाला दिले पत्र

संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नुने यांनी दिनांक ३ जुलै रोजी वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक यांना सादर केलेल्या निवेदनात पुढील मुख्य मागण्या मांडण्यात आल्या:

सी.पी.आर.एम.एस. योजनेचा लाभ सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळावा.

वार्षिक ₹२ लाख औषध सहाय्यता योजना सर्व पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात यावी.

राजीव रतन हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा गंभीर असून, नियमित साठा व पुरवठा सुनिश्चित करावा.

आरोग्य सहाय्यता निधी – अधिकाऱ्यांना ₹३६,००० व कर्मचाऱ्यांना ₹१२,००० वेळेवर मिळावा.

महागाई भत्ता नियमित दिला जावा.

सीपीआरएमएस प्रमाणपत्र जमा प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली जावी.

हे निवेदन नागपूर मुख्यालय, राजीव रतन हॉस्पिटल, पोलिस विभाग व इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले गेले आहे.

नगर परिषद क्षेत्रातील प्रमुख समस्या व मागण्या:

वर्धा नदीकाठची टाकलेली माती हटवावी, जेणेकरून नदीप्रवाह अडथळा येणार नाही.

वेकोली कॉलनीचा सांडपाणी व निचऱ्याचा प्रश्न – २००५ पासून प्रलंबित, त्वरित तोडगा काढावा.

प्राथमिक शाळांमध्ये दुरुस्ती व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

खाण धंसानग्रस्त भागात पुनर्वसन व नुकसानभरपाई द्यावी.

कोळसा धूळ व कचरा सफाई नियमित करावी.

वेकोली कॉलनीत पार्किंग व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

ग्रामपंचायत व नगर परिषद सीमावाद सोडवावा.

स्थानिक बेरोजगारांना रोजगार व रेहडीवाल्यांना कायम स्वरुपाचे ठिकाण द्यावे.

पोलीस व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगून नागरिकांशी बैठक घेऊन निर्णय घेण्याची मागणी.

संबंधितांना पाठवले पत्र

या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, कोळसा मंत्री (दिल्ली), खासदार, आमदार, पोलिस अधीक्षक, नगर परिषद अधिकारी, वेकोली व्यवस्थापन, पोलिस ठाणे प्रमुख आदी सर्व संबंधितांना पाठवले गेले आहे.

बहुउद्देशीय सीनियर सिटिझन आधार संस्थेने स्पष्ट केले आहे की प्रशासन आणि वेकोली व्यवस्थापनाने जर वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर संस्था शांततामय आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी अधिक तीव्रपणे मांडेल. घुग्घुसकर नागरिक आता प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये