ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्प मित्रांनी दिले अजगर सापाला जीवदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी विरुटकर यांच्या शेतामध्ये दि. 29 आगस्ट 2023 ला अजगर प्रजातीचा साप आढळुन आला.
विरुटकर यांनीं चंदनखेडा येथील सर्प मित्रांना या बाबत ची माहिती दिली. माहिती मिळताच सर्प मित्र विकास गायकवाड, मयुर नन्नावरे, कुणाल ढोक व विजय खडसंग यांनी विरुटकर याच्या शेतात जाऊन 9 फुट लांबी व 10 किलो वजन असलेल्या अजगर प्रजातीच्या सापाला पकडले.

त्या नंतर चंदनखेडा येथील सर्पमित्रांनी भद्रावती येथील सर्पमित्र अणुप येरणे, श्रीपाद बाकरे, आकाश देरकर व शैलेश पारेकर यांच्या सहकार्याने वनविभाग भद्रावती येथे नोंदणी व परवानगीने अजगर सापाला आयुध निर्माणी येथील जंगल परिसरात सोडुन जीवनदान दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये