अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, वर्धा तर्फे ” अंमली पदार्थ विरोधी जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थाचे वाढते प्रमाणाबाबत गंभीर दखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थाचे वाढते प्रमाणावावत गंभीर दखल घेण्यात आली असून विशेषतः युवक वर्ग या घातक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसतो आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर विपरीत परिणाम होत आहे. अंमली पदार्थाचे सेवन केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ विघडवत नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील चालना देत असल्यामुळे DRUGS FREE WARDHA अभियानांतर्गत आज दिनांक २९/०९/२०२६ रोजी अॅन्टीनाकर्कोटीक टास्क फोर्स वर्धा तर्फे जि.एस. कॉमर्स महाविद्यालय वर्धा येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
“Drugs Free Wardha”, संकल्पनेवर आधारित सुरक्षित भविष्याची दिशा आणि नशामुक्त समाज घडविण्याकरीता वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून तयार करण्यात आलेल्या NDPS Awareness video चे सादरीकरण करण्यात आले तसेच PPT presentation दाखवून अंमली पदार्थाचे दुष्परिणाबाबत माहीती देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी यांनी कार्यक्रमात सहभागी उपस्थितांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथक प्रमुख श्रीमती माधुरी वाघाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक “राष्ट्रगीत “घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नशा सोडा, जीवन जोडा, सुसंस्कृत समाज घडवूया, नशामुक्त वर्धा घडवूया असा महत्त्वपुर्ण संदेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. वर्धा शहराला प्रगत, सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनापासुन दूर राहावे असे आवाहन वर्धा पोलीसांतर्फे करण्यात आले.
सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती (Drugs Free Wardha) कार्यक्रम श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्षा, श्री. सदाशीव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, सपोनि श्रीमती माधुरी वाघाडे, पोउपनि सिनुकुमार बानोत, अॅन्टी नाकोर्टिक टास्क फोस, वर्षा मधील पोलीस अंमलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य व संपुर्ण प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



