ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय अंडर -१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवडीमुळे श्लोक वनकरच्या आयुष्यात “आनंद!”

महाराष्ट्र संघातून खेळण्यासाठी विदर्भातील एकमेव खेळाडू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी : गोंडपिपरीतील होतकरू खेळाडू श्लोक आनंद वनकर याची राष्ट्रीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याने त्याचा आयुष्यात नवा आनंद निर्माण झाला आहे. श्लोकच्या या निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धेत श्लोकने आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली. त्याची कामगिरी, क्रीडा कौशल्य, शिस्त व खेळातील सातत्य लक्षात घेऊन महाराष्ट्र संघासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अंडर-१७ टेनिस क्रिकेट स्पर्धा ३ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मथुरा, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत श्लोक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

गोंडपिपरी मधून राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याने श्लोकच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मजल मारणाऱ्या श्लोकच्या यशामुळे तालुक्यातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये