महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे सेवा संकल्प अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर राष्ट्रीय सेवा योजना व पंचायत समिती कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान, स्वच्छता हीच सेवा, अंतर्गत स्वच्छता दूत व स्वच्छता सफाई मित्र यांचा सन्मानच सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरु साईनाथ महाराज, आनंद दत्त धाम आश्रम, श्रीक्षेत्र माहूरगड हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य मा.प्रफुल्ल माहुरे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. माधव चिंतमवाड, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना, मा. पंढरी मुसळे केंद्रप्रमुख पंचायत समिती कोरपना, स्वच्छता दूत विनोद भोगेकर सुभाष खुजे, पोचुराम भाऊ नगरपरिषद गडचांदूर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मा.माधव चिंतमवाड यांनी केले तर या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदिप परसुटकर यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



