ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोषणेच्या आठवडाभरातच मंदिराच्या कामाला सुरुवात

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ करंजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आठवड्यापूर्वी दिलेला शब्द पूर्ण करत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांच्या पुढाकाराने २१ सप्टेंबर रोजी गावसभेत मंदिर बांधकामाबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आठवडाभरातच २८ सप्टेंबरपासून मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

तालुक्यातील करंजी हे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे गाव आहे. गावातील नूतन मंदिराच्या बांधकामाची ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. गावकऱ्यांची ही धार्मिक मागणी लक्षात घेऊन प्रदीप खोब्रागडे यांनी गावसभेत मंदिर बांधकामासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

२१ सप्टेंबर रोजी केलेल्या घोषणेप्रमाणे २८ सप्टेंबरला मंदिराच्या कामाची भूमिपूजनानंतर सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ करंजीकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे करंजी गावात नवीन मंदिर बांधकाम उभारणीसह गावाचा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात अधिक भर पडणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांनी, “गावाचा विकास हे माझे वैयक्तिक नाही तर सामूहिक ध्येय आहे. मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून गावाच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि संस्कृतीचे केंद्र आहे.ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करू”, असे प्रतिपादन केले.

मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी सुमन जेंगठे, कमल रामगीरवार, रेखा राठोड, सिंधू मोहुर्ले, तारा पचारे, माया आत्राम, झाराबाई चांदेकर, वंदना खोब्रागडे, मनिषा भोयर, वासुदेव मांदाळे, मनिषा भोयर, आबाजी मोहूर्ले, सुशील मांदाळे, विशाल कोडापे, अजय चावटकर, अंकुश गोहणे, गणपत जुवारे, बंडू का यांच्यासह ग्रामस्थ महिला पुरुषांची उपस्थिती होती.

करंजी गावातील मंदिर हे केवळ धार्मिक पूजस्थल नाही तर आपल्या संस्कृतीचे, एकतेचे आणि ग्रामविकासाचे प्रतीक आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हे मंदिर निश्चितच सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र ठरेल. “दिलेला शब्द _ केला पूर्ण”, या भावनेने कामाचे भूमिपूजन झाले असून आता मंदिराचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे.

*_प्रदीप खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते, करंजी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये