Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थांकडून पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

अभाविप चंद्रपूर महानगरचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

 भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते.

रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते,भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो.

हा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील चंद्रपूर पोलिस व वाहतूक शाखेतील पोलीस दादांना विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने पोलीस ठाण्यातील परिसरात जाऊन त्यांना औक्षण करून त्यांना रक्षणाचे बंधन बांधले. तसेच या रक्षाबंधन पर्वाच्या औचीत्याने सर्वसमभाव, आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर तर्फे हे अनोखा उपक्रम चंद्रपूर महानगर तसेच जिल्हयातील विविध शाखेत चालविल्या गेला.

या वेळी अभाविप चंद्रपूर महानगर तर्फे रामनगर पोलीस, तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे हा उपक्रम गुरूवार 31 ऑगस्ट रोजी चालविल्या गेला.
यावेळी विभाग संयोजक वैदेही मुडपल्लिवार, स्वरा गंपवार, विद्या मेश्राम, जान्हवी भोयर, प्रतीक्षा श्रोती, तनवी, जिल्हा संयोजक पियूष बनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश दिंडेवार, महानगर मंत्री आदित्य गच्केश्र्वर , रोहित खेडेकर, तन्मय बनकर, हर्ष भांदकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये