Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविवारी सूर्यांशचे पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन

डॉ. रवींद्र शोभणे, किशोर बळीसह दिग्गज कवी होतील सहभागी

चांदा ब्लास्ट

चंद्रपुरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२२ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण आणि विदर्भातील तसेच जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे दोन कविसंमेलन रविवार दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सरदार पटेल महाविद्यालयात संपन्न होणार आहे.

   स्नेहांकित संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजीव देवईकर यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या देखण्या सोहळ्यात गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, सरदार पटेल महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व कार्यक्रमाचे स्वागातप्रमुख डॉ. चेतन खुटेमाटे प्रामुख्याने उपस्थित असतील.

    मागील १० वर्षांपासून संस्थेतर्फे राज्यभरातील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून त्यावर्षी प्रकाशित विविध साहित्यकृतीच्या प्रवेशिका मागवल्या जातात आणि त्यातून पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा  पूनीत मातकर (गडचिरोली), दीपक तांबोळी (जळगाव), डॉ. स्मिता दातार (मुंबई), संजय गोराडे (नाशिक) तसेच डॉ. सविता कांबळे (नागपूर) यांच्या पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

   स्थानिक पातळीवर देण्यात येणारे पुरस्कारदेखील प्रदान करण्यात येणार असून डॉ. धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी) मारोती भारशंकर (चंद्रपूर) आणि सूरज दहागावकर (चंद्रपूर) याना ते प्रदान केले जाईल.

  याच कार्यक्रमात अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात येणार असून याप्रसंगी ते मनोगत व्यक्त करतील.

दुसऱ्या सत्रात विदर्भातील अकरा जिल्ह्यातील कवींचे बहारदार कविसंमेलन होणार.

    कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी, निवेदक आणि अभिनेता किशोर बळी (अकोला) असतील आणि सूत्रसंचालन कवी किशोर कवठे (राजुरा) करतील. कविसंमेलनात आबेद शेख (यवतमाळ) विशाल इंगोले (बुलडाणा) गजानन मते (अमरावती) विवेक कापगते (भंडारा) क्षितिजा बापट (गोंदिया) वैभव भिवरकर (वाशिम) मालती सेमले(गडचिरोली) संदीप धावडे( वर्धा) अजीज पठाण (नागपूर) श्रीपाद प्रभाकर जोशी, पद्मरेखा धनकर चंद्रपूर आपल्या कविता सादर करतील.ज्येष्ठ कवी ना. गो. थुटे अतिथी कवी म्हणून उपस्थित राहतील.

    तिसऱ्या सत्रात जिल्ह्यातील निवडक कवींचे कविसंमेलन ज्येष्ठ कवी विद्याधर बनसोड यांचे अध्यक्षतेत होणार असून युवा कवी स्वप्नील मेश्राम आणि कवयित्री आरती रोडे संचालन करतील. कविसंमेलनात नरेशकुमार बोरीकर, संगीता बढे,जयश्री कोटगिरवार आणि प्रवीण आडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कविसंमेलनात रेवानंद मेश्राम,किरण चौधरी, प्रवीण तुराणकर,दिलीप पाटील, विजय वाटेकर,अरुण झगडकर,निलेश तुरके, दीपक शिव, गीता रायपुरे, गजानन माद्यस्वार, किशोर जामदार, शीतल कर्णेवार, ललित बोरकर, धनंजय साळवे,अरुण घोरपडे, वैशाली रामटेके,जयंत साळवे, अनिल पिट्टलवार,तनुजा बोढाले, सीमा भसारकर, रमेश भोयर, अर्जुमन शेख, मंजुषा दरवरे, कविता बेदरकार,सुरेश गारघाटे, आशिष घुमे आणि शिरीष दडमल यांचेसह जिल्ह्यातील जुने नवे पस्तीस कवी आपल्या कविता सादर करतील.

  पुरस्कार वितरण आणि कविसंमेलनात जास्तीत जास्त साहित्य रसिक आणि सुर्यांशप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव प्रदीप देशमुख, स्वप्नील मेश्राम, तनुजा बोढाले, सुनील बावणे, गीता रायपुरे,विवेक पत्तीवार, योगेश भलमे यांचेसह संस्थेच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये