ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हनुमान मंदिरात चोरी

एकता नगर वेकोली भद्रावती येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                  शहारा लागत असलेल्या एकता नगर वेकोली वसाहती लगतच्या हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी सह हनुमान मूर्तीचे चांदीचे आभूषण चोरी केल्याची घटना मंगळवारला मध्यरात्री घडली. याप्रकरणी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

                हनुमान मंदिरातील पुजारी आज मंदिरात आले असता त्यांना दानपेटी, मूर्तीवरील चांदीचे दागिने अंदाजे किंमत १७ हजार चोरी गेल्याचे कळले. यात मूर्तीचे डोळे, एक चांदीचा नाग व काही चांदीचे आभूषणे आहे. ही सर्व बाब मंदिराच्या अध्यक्षांना कळताच मंदिराचे अध्यक्ष रामदास सातपूते यांनी या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली असून पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये