Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी तर्फे रक्षाबंधन निमित्त आरोग्य तपासणीची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी च्या वतीने “आजादी का अमृत महोत्सव,” या संकल्पने राजीव गांधी सभागृह कुर्झा रोड ब्रह्मपुरी येथे “रक्षाबंधनाच्या” औचित्य साधून घनकचरा सफाई कामगार यांचे आरोग्य तपासणी ची भेट नगरपरिषद ब्रह्मपुरी तर्फे देण्यात आली. उपस्थित असलेले कर्मचारी व सर्व काम सफाई कामगार यांना टीटी इंजेक्शन देऊन त्यांची मुख कर्करोग तपासणी, बीपी,शुगर,एच आय व्ही तसेच रक्ताच्या इतर तपासण्या करण्यात आल्या.

सदर शिबिराला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आशिया जुही मॅडम, नगराध्यक्ष रीता उराडे मॅडम, आरोग्य सभापती श्री बाळू शुक्ला, मा. रामटेके साहेब डॉ. गणवीर सर डॉ.दोनाडकर सर,डॉ. जीवानी सर, डॉ. परवणी मॅडम, डॉ नागमोती सर,डॉ सिडाम, डॉ खरकाडे मॅडम रागिनी धात्रक, अंजिरा आंबीलडूके,शितल मडावी, प्रिया आखाडे,उज्वला नंदेश्वर श्रुती ढोमणे, श्री विलासजी लेनगुरे STS क्षयरोग मीनाक्षी गाठे लिंक वर्कर इ.कर्मचारी वृंद उपस्थित होते.

अगदी गर्भधारणा झाली तेव्हापासून मातीची व होणाऱ्या बाळाची सहा वर्षापर्यंत जी अंगणवाडी सेविका व मदतनीस काळजी घेते अशा कुटुंब आणि आरोग्य यांचा पाठीचा कणा असलेल्या एकूण 370 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अगदी बीपी, शुगर तपासण्यापासून मुख कर्करोग, स्तनकर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, एचआयव्ही थायरॉईड ईसीजी, एक्स-रे, ते रक्ताच्या इतर तपासण्या करून सविस्तर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. दुसऱ्यांचे आरोग्य जपता जपता यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, यासाठी शासनाने हातात घेतलेले आरोग्याचे उपक्रमा च्या हाकेला ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी च्या चमुने उत्कृष्ट सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये