Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे राष्ट्रीय क्रीडादीनानिमित्य योगाचे महत्व

शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे राष्ट्रीय क्रीडादीनानिमित्य योगाचे महत्व विद्यार्थाना पटवून दिले, संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष पियुष आंबटकर, अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, प्रा. मस्के सर, रजिस्टर बिसेन सर, क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे,सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आले. विद्यार्थाना सहजयोग ध्यान साधनेचे लाभ ,शारीरिक विकार उत्पन्न होत नाही,शारीरिक,मानसिक दोष दूर होऊन तो संतुलित होतो.

राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून औचित्य साधून योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर, योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसंरत प्राप्त होते. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे.दररोज योग केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो,शरीर आणि मन शांत करण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो. योगा केल्यानी शरीराला ऊर्जा मिळते,तसेच यामुळे श्वसन,ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.योगामुळे तणाव दूर होतो,चांगली झोप लागते.योग विषयी विद्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना योगा हि भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे,तसेच सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्याकरता पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरावरून आपले दुर्लक्ष होते. योगा म्हणजे काय,योगाचा इतिहास काय आहे,फायदे कोणते आहे,विध्यार्थाना उत्तम आरोग्य हवे तर योग करण्याशिवाय पर्याय नाही. एकच दिवस योगा करून उपयोग नाही तर तिला चळवळीचे रूप मिळाले पाहिजे.विद्यार्थानी योग करण्याचे महत्व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सांगितले पाहिजे तसेच दररोज योगा केला गेला पाहिजे,योगा करा,आणि तंदुरुस्त राहा.

योग हा व्यायामाचा एक प्रकार आहे योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. योगाचे फायदे विद्यार्थाना सांगत असताना सर्व स्तरांवर तंदुरुस्ती तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. अशाप्रकारे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कार्यक्रमाला योगा केंद्र प्रमुख नरेंद्र नन्नावरे,सुचिता गुप्ता,आरती पंजाबी,संदीप देवलकर,सीमा घडीनकर यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.यामध्ये शिक्षक व शिक्षेतरी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये