Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले.

विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मीनाक्षी ठोंबरे, प्रमुख अतिथी प्रा.डॉ. प्रज्ञा जुनघरे, मार्गदर्शन प्रा.लोकेश दरवे, प्रा. डॉ.आनंद वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पित करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मीनाक्षी ठोंबरे यांनी २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व विशद करून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रा.लोकेश दरवे यांनी महिलांना कुटुंब, समाजातून प्रोत्साहन मिळत नसल्याने कौशल्य असूनही अनेक खेळाडूंची वाताहत होत आहे असे मत व्यक्त केले. प्रा.डॉ.प्रज्ञा जुनघरे यांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे फिट इंडिया या बाबत उपस्थितांना शपथ दिली व महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ. आनंद वानखेडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनीची मोठया संख्येने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्राध्यापक व शिक्षक्केतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये