Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आठ हजार रुपये असलेली ती पर्स कुणाची? एस टी वाहकाला पडला प्रश्न

वाहकाने प्रामाणिकपणे आगारात जमा केली पर्स - वाहक रवी पिसे ह्यांचेवर कौतुकाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

आजच्या काळात कुणाला 50 रुपये जरी सापडले तरी ते पैसे कुणाचे ह्याचा शोध घेण्याऐवजी पैसे खिशात टाकण्याकडे कल असलेल्या आजच्या काळात तब्बल 8 हजार 136 रुपये असलेली बेवारस पर्स प्रामाणिकपणे एस टी आगारात जमा करणाऱ्या महामंडळाचे चालक रवी पिसे ह्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त्त असे की, राजुरा आगारात वाहक पदावर कार्यरत रवी पिसे चंद्रपूर गडचांदुर मार्गावर कर्तव्यावर होते. दरम्यान गडचांदुर बस थांब्यावर तिकीट देत असताना त्यांना एका आसनावर अज्ञात महिलेची पर्स आढळुन आली. त्यांनी बस मधे चौकशी केली असता ती बस मधील सर्व महिलांनी त्या पर्स बाबत माहिती नसल्याचे सांगितल्याने वाहक रवी पिसे ह्यांनी पर्स उघडून बघितली असता त्यात ८ हजार १३६ रुपये रोख असल्याचे आढळुन आले.

अखेरीस वाहकाने ती पर्स मुळ मालकिणीला मिळावी ह्यासाठी आपली फेरी संपल्यानंतर

पुर्ण पैशांसह राजुरा आगारातील अधिकारी इमरान यांचे समक्ष वाहतुक नियंत्रक नरेंद्र लवणे यांचेकडे सुपूर्त केली असुन ज्यांची कुणाची ही पर्स आहे त्यांनी ओळख सिद्ध करून पर्स राजुरा आगारातून परत न्यावी असे आवाहन रवी पिसे ह्यांचेसह आगार व्यवस्थापकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये