ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खैरे कुणबी समाजाचा विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा

ज्येष्ठांचा सत्कार व स्नेह मिलन सोहळा २०२६ चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरच्या वतीने समाजबांधवांच्या एकत्रीकरण अभियानांतर्गत राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा, दिनदर्शिका २०२७ व ‘ऋणानुबंध’ परिचय पुस्तिकेचे प्रकाशन आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा रविवारी, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागपुरातील धरमपेठ परिसरातील अलंकार टॉकीजसमोर असलेल्या कुसुमताई वानखेडे सभागृहात उत्साहात पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक टेमराज माले सेवानिवृत्त शिक्षक, जि. प. नागपूर तर अध्यक्षस्थानी निलेश महाजन (उद्योजक) हे असणार असुन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विकास ठाकरे आमदार, पश्चिम नागपूर व करणभाऊ देवतळे आमदार वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र हे राहणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती सुभाष धोटे माजी आमदार, राजुरा, अशोक शिंदे माजी राज्यमंत्री, देवराव रडके माजी आमदार कामठी, अरुण डोंगरे माजी जिल्हाधिकारी नांदेड, रत्नमाला भोयर माजी नगराध्यक्ष मुल, पांडुरंग हिवरकर माजी महापौर नागपूर, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल चिताडे अधिष्ठाता गोंडवाना विद्यापीठ आणि अँड. प्रिया झोटिंग यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम दीप प्रज्वलन व उद्घाटन सोहळा, राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळावा, ‘ऋणानुबंध’ परिचय पुस्तिका व दिनदर्शिका २०२७ चे विमोचन, विविध जिल्ह्यातील संघटन टीमचे स्वागत, समाजातील प्रतिष्ठित समाजबांधव व ज्येष्ठ मंडळींचा विशेष सत्कार, विवाह पूर्व समुपदेशन व युवक-युवती संवाद होणार आहे. या सोहळ्याचे प्रेरणास्थान आचार्य भाऊसाहेब झिटे, कै. डॉ. सुभाष चौधरी, कै. विजय चाफले हे असून, बायोडाटा संकलन विदर्भ खैरे कुणबी विवाह मंच अध्यक्ष स्वप्नील रोहणकर, सचिव डॉ. प्रदिप महाजन यांनी केले असुन श्री महादेव वैद्य खै. कु. संघटना व श्री मोहन डंभारे अध्यक्ष आयोजन समिती व खैरे कुनबी समाज पश्चिम नागपूर यांनी समाजातील सर्व घटकांनी व सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये