सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने बाळासाहेब ठाकरे व लाला लजपतराय यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा १४वा स्मृतिदिन व महान स्वातंत्र्य सैनिक पंजाब केसरी लाला लजपतराय यांची पुण्यतिथी देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय , जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानद संचालक गोविंदराव अहिरे, होते.
यावेळी सर्वश्री.रमेश नरोडे प्रा.अशोक डोईफोडे, घनश्याम भंडारे,गोविंदराव अहिरे, प्रा विनायक कुळकर्णी यांनी बाळासाहेब ठाकरे व लाला लजपतराय यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, यावेळी प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर,मधुकरराव धुळे, अरुण सपाटे, बाबुलाल शिवरकर, उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.


