विदर्भातील शीख बांधवांना एकत्र आणणारी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद – मा.खेमराज तिडके
आमदार चषक ऑल ओपन सिख प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात ; खेमराज तिडके उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- महाराष्ट्राच्या विविध भागांतील शीख बांधवांना एकाच क्रीडा व्यासपीठावर आणणारी ब्रम्हपुरी येथील आमदार चषक ऑल ओपन सिख प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा उपक्रम ठरत आहे. केवळ शीख बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील एकता आणि क्रीडाभावनेला प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी केले.
ब्रम्हपुरी येथील खालसा लॉयन्स क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रायोजकत्वाखाली दि. १७ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत टोल नाक्याजवळील पॉलिटेक्निक कॉलेज समोरील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून शीख बांधव या स्पर्धेत सहभागी होणार असून, स्पर्धेला खेमराज तिडके उपस्थित होते.
यावेळी शहर काँग्रेस पदाधिकारी सोमेश्वर उपासे यांच्यासह अन्य मान्यवर, आयोजक व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.


