ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर अंतर्गत कुटकी गावामध्ये आरोग्य शिबीर आयोजित

डॉ. स्वप्नील बेले व डॉ. नलिनी विखे यांनी किटकजन्य आजाराबाबत केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर अंतर्गत कुटकी गावामध्ये *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील बेले व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे आणि तालूका आरोग्य अधिकारी डॉ विशाल रुईकर जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक आशिष देशमुख, आरोग्य पर्यवेक्षक कुमारी भुसारी, आरोग्य सहाय्यक जोशी कांबळे, पाटणकर, व इतर आरोग्य सेवक व सेविका यांनी कुटकी गावातील नागरिकांना किटक जन्य आजार हिवताप डेंग्यू चिकनगुनिया व इतर आजाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असून गावामध्ये आरोग्य शिबीर व IRS धूर फवारणी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने नागरिक व आशा स्वयंसेविका हजर होते…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये