ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू!

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेत कामकाज बंद ठेवले आहे.

वेतनवाढीचा प्रलंबित प्रस्ताव आणि विविध मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी विविध टप्प्यांत आंदोलन केले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.

या संपात रमेश अलोने, दिपक गुल्हाने, तेजस ताजने, संघर्ष रंगारी, संतोष गुरनुले, उमेश आमटे, प्रमोद मोगरकर, देवानंद नळे, संदीप चौधरी, निळकंठ सांगळे, सचिन नैताम आणि दिलीप घुगुसकर सहभागी झाले आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी नानाजी ठेंगणे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे गोंडपिपरी येथील न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने प्रलंबित मागण्यांवर लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये