ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात काँग्रेसचे जनआंदोलन : लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी जनतेने जागरूक राहावे : सुभाषभाऊ धोटे

जिल्हा/शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेले ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत ‘वोट बचाओ – देश बचाओ’ जनआंदोलन गुरुवारी गांधी चौक, चंद्रपूर येथे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पैदल मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय जवळ जाहीर सभा घेण्यात आली. शेवटी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे म्हणाले, “लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आमचे नेते मा. राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत आणि आम्ही पुढेही यासाठी संकल्पबध्द आहोत. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच आपल्या मुलभूत हक्कांसाठी नागरिकांनी जागृक राहणे आवश्यक आहे.”

खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, ‘वोट बचाओ – देश बचाओ’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून सद्या परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या अधिकारांशी आणि संविधानिक मूल्यांशी जोडलेली व्यवस्था आहे. मतदारांचा अधिकार सुरक्षित राहणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी काँग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील.

यावेळी आमदार अँड. अभिजित वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, संतोष लहामगे, गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, उमाकांत धांडे, सपना मोरे, पवन भगत, सुनीता गोवर्धन, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, राजु रेड्डी, दिनेश चोखारे, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, रंजन लांडे, गोविंदा उपरे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, निर्मला कुडमेथे, युवक काँग्रेसचे सौरभ टिपले, नरेश गुलप्ल्ली, मंगेश बावणे, अभिजीत गोंगले, आशिष बोंडे, काँग्रेसचे प्रदेश, जिल्हा व शहर स्तरावरील काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाडी संघटनांचे पदाधिकारी, विभाग व सेलचे पदाधिकारी तसेच काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये