ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार बच्चू कडू यांचा भद्रावती दौरा : निप्पॉन प्रकल्पग्रस्तांसह विविध प्रश्नांवर होणार चर्चा

लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आमदार बच्चू कडू यांचा भद्रावती दौरा असून, या दौऱ्यात निप्पॉन डेंत्रो प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या तसेच बेरोजगारी, शेती पुनर्वसन, प्रदूषण आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालय, भद्रावती येथे दि.९ रोजी दुपारी दिड वाजता आयोजित चर्चासत्रात प्रकल्पग्रस्त नागरिक, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.

तसेच KPCL कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, प्रदूषणाचा प्रश्न, प्रकल्पबाधित शेतकरी व कामगारांच्या अडचणी आणि माजरी खदान, नागलोन परिसरातील बेरोजगार शेतकरी व प्रदूषणाच्या समस्या याबाबतही चर्चा होणार आहे.

या दौऱ्यामुळे प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना आमदार बच्चू कडू यांच्यासमोर थेट मांडण्याची संधी उपलब्ध झाली असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये