लोकशाहीच्या रक्षणासाठी चंद्रपुरात काँग्रेसचे जनआंदोलन
काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंचे आवाहन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर :– लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘लोकतंत्र बचाओ सप्ताह’ अंतर्गत ‘वोट बचाओ – देश बचाओ’ या घोषवाक्याखाली चंद्रपुरात जनआंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. हे जनआंदोलन गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे होणार आहे. लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांची जपणूक आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या जनआंदोलनात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाडी संघटनांचे पदाधिकारी, विभाग व सेलचे नेते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले आहे.
लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जनआंदोलनाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.


