स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे केव्हीआर कंपनीला निवेदन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा तालुक्यात नव्यानेच सुरू झालेल्या केव्हीआर या कोळसा खाणीतून माती उत्खनन कंपनीत स्थानिक कुशल रोजगारांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात वाहन चालक व कामगारांसाठी कार्यरत असलेल्या अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने केव्हीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले.
मौजा गोयेगाव तालुका राजुरा येथील कोळसा खदाणीत माती उत्खनन करण्याचे काम केव्हीआर या कंपनीला प्राप्त झाले.
कंपनीने काम चालू करून दोन महिन्याहून अधिक कालावधी झालेला आहे तरीपण कंपनीने स्थानिक कामगार घेण्यास टाळाटाळ करून परप्रांतीय कामगारांना सामावून घेतल्या जात आहे ही स्थानिक कामगारांच्या रोजगाराची थट्टा आहे.
इथे प्रदूषणामुळे होणारे शेतीमालाचे नुकसान, त्रास, आजारपण हे
स्थानिक लोक सोसत असतात. येणाऱ्या कारखान्याला जमीन जुमला सोयी सुविधा स्थानिक लोकांकडून पुरविण्यात येत असते. असे असताना स्थानिक लोकांना रोजगारापासून स्थानिकांना जर डावलत असाल तर स्थानिकांनी जगावे तर जगावे कशाच्या आधारावर? स्थानिकांची उपासमार आणि रोजगार पूर्ण परप्रांतीयांना हे कसे काय खपवून घेतल्या जाणार?
चंद्रपूर जिल्ह्यात पांच सिमेंट कारखाने, आशिया खंडातील सर्वात मोठा विद्युत कारखाना, कोळस्याच्या खाणी, त्याला जोड कोल वाशरिज, माती उत्खनन कंपनी, स्टील उद्योग आणि एम आय डी सी च्या माध्यमातून लहान मोठे उद्योग कारखाने असले तरी या भागातील कुशल- अकुशल कामगार बेरोजगारांना रोजगार नसल्याने आणि त्याचवेळी संबंधित उद्योगांत परप्रांतीयांच्या फार मोठ्या प्रमाणात शिरकाव सुरू असल्यामुळे येथील बेरोजगारीत दिवसेंदिवस भर पडत आहे आणि बेरोजगारत येथील उद्योग धंद्याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास स्थानिक बेरोजगाराच्या असंतोषाचा उद्रेक कधी होईल हे सांगता येत नाही.
यासंदर्भात केव्हीआर या माती उत्खनन कंपनीसोबत चर्चा आणि निवेदन देण्याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ उपरे, संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार तथा रिपाइंचे महाराष्ट्र राज्य चिटणिस अशोककुमार उमरे, संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंपतभाऊ राजूरकर, युवा जिल्हाउपाध्यक्ष हंसराज ताकसांडे आणि यांच्या सोबत मोनू मडावी, सोनू निषाद, संदीप वांढरे, समीर जांभूळकर, जयदेव बिसवार, सन्नी कुमार, शिवाजी धुपे, राम वरदलवार, हंसराज ताकसांडे, प्रविण चेनवेनवार, श्रीकांत जेल्लालवार, अविनाश कुळमेथे, दशरथ कोंडावार, अजय इग्रपवार, पंकज वरफडे, पवन गुप्ता, आकाश ताकसांडे, प्रदीप गुरनुले, प्रविण जेल्लालवार, शेवाग जमनापूरे संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपि मा. ना.पालकमंत्री कार्यालय चंद्रपूर, मा.खासदार साहिबा चंद्रपूर, मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, मा.पोलिस अधीक्षक साहेब,चंद्रपूर, मा.पोलिस निरीक्षक साहेब,राजुरा मा. क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय रामपूर इत्यादींना देऊन स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या संदर्भात अवगत करण्यात आले अन्यथा अनैशा वाहन चालक कामगार संघटना गप्प बसणार नाही जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला


