संजय मेंढी यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा ; अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
सुनील झाडे यांची शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना / गडचांदूर :- गडचांदूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय भास्करराव मेंढी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ६) यशवंत नगर, हनुमान मंदिर परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्याने कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा समन्वयक तथा राजुराचे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, चंद्रपूर जि. म. सह. बँकचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, कृ. उ. बा. समितीचे सभापती अशोकराव बावणे, नोगराज मंगरूळकर, महेंद्र ताकसांडे, विठ्ठलराव थिपे, सचिन भोयर, शिवकुमार राठी, धनंजय गोरे, न. प. पाणीपुरवठा सभापती सरवरभाई शेख, नगरसेविका रजिया सुलताना, संतोष महाडोळे, अहमद भाई, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, महादेव हेपट, विवेक येरणे, साजिद शेख, उमेश राजुरकर, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.
संजय मेंढी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पवन देरकर, आकाश वराठे, निखिल ऐकरे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल सूर्यतळ यांचेसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यामुळे स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनात्मक घडामोडींना कार्यक्रमात महत्त्व प्राप्त झाले. संजय मेंढी यांनी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मेंढी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनात नगरसेवक चेतन शेंडे, गटनेत्या प्रणिता उपाध्ये, अर्चनाताई मोरे, मनिषाताई परचाके, यांच्यासह काँग्रेसचे शहर व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.



