
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर विभागातर्फे गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ५६ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णांचा रक्तदाब आणि हिमोग्लोबिन (एचबी) तपासण्यात आला.
शिबिराला उपस्थित रुग्णांची तपासणी डॉ. महेश लोकारे आणि डॉ. जैनिल पटेल यांनी केली. रुग्णांच्या आरोग्यस्थितीनुसार डॉक्टरांनी योग्य वैद्यकीय सल्ला दिला तसेच आवश्यक उपचार व औषधे उपलब्ध करून दिली. ग्रामस्थांनी सीएसआर विभागाच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे कौतुक केले.
यापूर्वी माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर विभागातर्फे जवळील सहा गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ३८२ नागरिकांची तपासणी करून उपचार करण्यात आले. या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांना त्यांच्या गावातच प्राथमिक आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या आरोग्य शिबिराचे आयोजन सीएसआर विभागाच्या सोनाली ठाकोर यांच्या समन्वयाने करण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने सीएसआर विभागातर्फे नियमितपणे अशा शिबिरांचे आयोजन केले जाते.


