ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत कोरपणा तालुक्याची तालुकास्तरीय कार्यशाळा गडचांदूर येथील बालाजी सभागृहात 7 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली, सदर कार्यशाळेला गटविकास अधिकारी कोरपणा तथा अध्यक्ष माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची तालुकास्तरीय समिती श्री .श्रीकांत बोबडे , महिला व बालकल्याण अधिकारी कोरपणा सौ. मनीषा पाचभाई मॅडम ,जिल्हास्तरीय अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी ( साथ रोग )डॉ. किशोर भट्टाचार्य ,अंबुजा फाउंडेशन उपरवाहीचे प्रकल्प व्यवस्थापक तथा सदस्य तालुकास्तरीय आजगाव आरोग्य संपन्न गाव समिती कोरपणा श्री. जितेंद्र बैस ,अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स आवळपूर ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोकरे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय डॉ. प्रवीण येरमे तालुका आरोग्य अधिकारी कोरपणा तथा सचिव माझा गाव आरोग्य संपन्न गाव तालुका स्तरीय समिती डॉ. स्वप्नील टेंभे तथा सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी , आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामपंचायत अधिकारी , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी, मोबाईल मेडिकल युनिटचे अधिकारी व कर्मचारी, हत्तीरोग विभागातील कर्मचारी, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी पर्यवेक्षिका,आशा गटप्रवर्तक आशा वर्कर उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे प्रस्ताविक वैद्यकीय अधिकारी कवठाळा डॉक्टर सरला रंगारी मॅडम यांनी केले. श्री . जितेंद्रजी बैस यांनी शासन व कॉर्पोरेट यांच्यातील समन्वय तथा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वर मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत कर्मचाऱ्यांचे गट बनवून गटचर्चा करण्यात आली तथा माझगाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात आतापर्यंत केलेली कार्यवाही तथा या पुढील सहा महिन्याचे नियोजनाची माहिती देण्यात आली तसेच शासन निर्णयाची वाचन करून एकदा उजळणी देण्यात आली. संघीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने गटचर्चा करण्यात आली.

सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक शी कल्पक जी ठमके यांनी केले. आभार प्रदर्शन मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शालिनी तरोन यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील श्री .भाग्यवानजी कंडे , श्री. सतीची पांढरे, श्री. लवकुश जाधव श्री .संदीप कांबळे श्री राजेश हिरेमठ श्री.ज्ञानेश्वर कपाले ,श्री कुणाल लुथडे श्री . प्रज्वल ताकसांडे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये