पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५३२/१८ कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४ भादंवि मधील आरोपीस शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विद्यमान मा. श्री. सी.ए. गवई, प्रथम श्रेणी न्यायालय ३ हिंगणघाट यांनी पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५३२/१८ कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४ भादंवि मध्ये आरोपी अरूण किसनाजी कामडी, वय ४५ वर्षे, रा. गणेशपूर (कान्हापूर) यांस खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम ३२३ भादंवि मध्ये १ महिना सश्रम कारावास व १०००/-रू. दंड, दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा.
२. कलम ३४१ भादंवि मध्ये १५ दिवस साधा कारावास व ५००/-रू. दंड
घटनेचा थोडक्यात तपशील :
यातील फिर्यादी पुंडलीक दमडूजी भेंडे, वय ७१ वर्षे, रा. काजी वार्ड हिंगणघाट यांचे शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने ते पायदळ शेतात जात असतांना आरोपी याने हातात कुऱ्हाड घेवून फिर्यादीस असून पूढे जाण्यास मनाई केली. पांदण रस्ता करण्यास अडथळा का करतो असे म्हणून वाद घालून शिवीगाळ केली व हातातील कुऱ्हाडीचे मुंदनीने डाव्या डोळ्याचे खाली, कुऱ्हाडीचे दांड्याने डाव्या पायावर तसेच हातात दगड घेवून पाठीवर मारून फिर्यादीस जखमी केले. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालावरून पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५३२/१८ कलम ३४१, ३२४, ३२३, ५०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोहवा परमेश्वर झमरे, ब.नं. १२११ पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रिया शेंडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा/सिमा जांगडेकर, ब.नं ९५१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो. स्टे हिंगणघाट ठाणेदार पो.नि. अनिल राऊत यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. विद्यमान मा. श्री. सी.ए.गवई, प्रथम श्रेणी न्यायालय ३ हिंगणघाट यांनी गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३२३ भादंवि मध्ये १ महिना सश्रम कारावास व १०००/-रू. दंड, दंड न भरल्यास १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा आणि कलम ३४१ भादंवि मध्ये १५ दिवस साधा कारावास व ५००/-रू. दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक, स्था.गु. शाखा वर्धा


