ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास विद्यालयाच्या मुलांचा खो-खोमध्ये डंका

जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले विजेतेपद.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

दि.०४ ऑक्टोबर २०२६ रोजी रविवारला चंद्रपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहिरगाव येथील १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. विहिरगावसारख्या दुर्गम भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून शाळेचा आणि शिक्षकांचा मान वाढवला आहे.

या स्पर्धेत विहिरगावच्या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पहिल्या सामन्यात त्यांनी ब्रम्हपुरी संघाचा १२ गडी राखून धुव्वा उडवला. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सामन्यात वरोरा संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. अंतिम सामन्यात विहिरगावच्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत राजुरा संघाला ९ गडी राखून पराभूत केले आणि जिल्हास्तरीय चषक आपल्या नावावर केला.

या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक श्री. पवन शेंडे सर (उच्च माध्यमिक शिक्षक) आणि आपल्या आई-वडिलांना दिले. शेंडे सरांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच संघाने हे यश संपादन केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विजेत्या संघात या खेळाडूंचा होता समावेश:

विजेत्या संघामध्ये अनिकेत युवराज घुबडे, नयन पुरुषोत्तम निकेसर, क्रीश श्रीकृष्ण निकोडे, रोहित चंद्रकांत तिवाडे, श्रेयश अरुण झाडे, आदित्य अरुण किनेकार, सिंचन सुधीर साळवे, स्वरूप सोमनाथ हुलके, साहिल सूर्यकांत घरत, आदेश धनराज सोनवाणे, करण किशोर मेश्राम आणि इशांत भगवान सातपुते या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश होता.

जिल्हा पातळीवर घवघवीत यश संपादन केल्याबद्दल लोकसेवा मंडळ विहिरगाव तसेच विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच पुढील विभागीय खो-खो सामन्याकरिता सर्व खेळाडूंना आणि मार्गदर्शकांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये