ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा :_ महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नांदा येथे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व स्वच्छतेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांची साधी राहणी, प्रामाणिकपणा, देशसेवा व राष्ट्रभक्ती याविषयी प्रभावीपणे विचार मांडले. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश दिला.स्पर्धेसाठी प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

तीन मिनिटांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व प्रभावी शैलीत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल मुसळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी प्रा. बोभाटे सर व प्रा. दुर्योधन सर यांनीही मार्गदर्शन केले.स्पर्धेत प्रथम क्रमांक हिमांशु उइके, द्वितीय क्रमांक वैशाली सातघरे, तर तृतीय क्रमांक चैताली सिडाम यांनी पटकावला. विजेत्यांचे अभिनंदन तर ईतर स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. दुमोरे सर व प्रा. बांगडे सर यांनी परीक्षण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जमदाडे मॅडम,सूत्रसंचालन प्रा. विरुटकर मॅडम यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. बल्की मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मुसळे मॅडम, प्रा. सातपुते सर, प्रा. लालसरे सर तसेच विद्यार्थी व भास्कर भाऊ गोंडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये