गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 05 ऑक्टोंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीषीर खबरेवरून मौजा केळझर, उडाणपुल बोगद्याचे खाली सर्व्हिस रोडवर सापळा रचुन एका पल्सर 150 मोटर सायकल क्र. एम.एच. 40 डि.डि. 6222 वर एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी अजयसिंग उर्फ सुखा किसनसिंग बावरी रा. शासकिय विश्रामगृह समोर वार्ड नं. 01 केळझर हा मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता वाहतुक करतांना मिळुन आला असुन, सदर गांजाचा माल हा त्याचे स्वतःचे व त्याचा भाऊ भोलासिंग किसनसिंग बावरी याचे मालकिचा असुन, ते दोघेही मिळुन गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असुन, सदर गांजाचा माल हा त्याने त्याचा मामा गगनसिंग अगदसिंग दुधानी रा. नेहरू विद्यालय जवळ वार्ड नं. 06 रायपुर हिंगणा नागपुर याचेकडुन खरेदी केला. नमुद सर्व आरोपी हे संगणमताने गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 01 किलो 23 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, मो.सा. व मोबाईलसह जु.कि. 1,71,150 रू चा मुद्देमाल जप्त करून, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सिनुकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



