ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीधरांच्या विकासासाठी ही निवडणूक ; विजयाचा सुधाकर कोहळेंचा दावा

कौशल्य विकास, पदवीधरांना रोजगार आणि विद्यापीठांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर :_ विदर्भातील पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देत कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांनी सांगितले. विद्यापीठांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पदवीधरांना केवळ पदवी मिळणे पुरेसे नसून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षणाला चालना देण्याची गरज असल्याचे कोहळे यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रातील अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच विद्यापीठांच्या विविध प्रशासकीय समस्यांवरही लक्ष केंद्रित करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्याने विदर्भातील विकासकामांना गती देण्याबरोबरच पदवीधरांच्या प्रश्नांवरही प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, निवडणूक अटीतटीची नसून भाजपा उमेदवार म्हणून आपला एकतर्फी विजय निश्चित असल्याचा दावा कोहळे यांनी केला. पदवीधर मतदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यामुळे विजयाचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

*पदवीधरांच्या प्रश्नांवर भर.

*कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती.

*शैक्षणिक अडचणींचे निराकरण.

*विद्यापीठांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा.

*रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य.

*विदर्भाच्या विकासासाठी शासनस्तरावर प्रभावी समन्वय.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये