ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म. गांधी विज्ञान महाविद्यालयात २६ व २७ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान परिषद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने International Conference on Research Innovations in Science and Technology (ICRIST-2026) ही परिषद घेणार असून **गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली; Association of Chemistry Teachers (ACT), Mumbai तसेच UltraTech Cement Ltd., Manikgarh Cement Works Unit, Gadchandur** यांच्या सहकार्याने २६ व २७ ऑक्टोबर २०२६** ही परिषद **हायब्रिड पद्धतीने** आयोजित करण्यात येणार आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन, नवनवीन संकल्पना, संशोधनातील आधुनिक प्रवाह तसेच विविध वैज्ञानिक विषयांवरील विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, वैज्ञानिक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

परिषदेत विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधन विषयक विविध विषयांवर विविध क्षेत्रातील विषय तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळा चे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी IQAC चे समन्वयक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ही परिषद घेणार असून अधिकाधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये