ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर सफाई कामगारांच्या संघर्षाला यश!

राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी राम रावते यांच्या हस्ते कामगारांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा नगरपंचायत प्रशासनाचे लेखी आश्वासन ; किमान वेतन, पीएफ, सुरक्षा साधने व वेतनातील तफावत दूर करण्यासह सर्व प्रलंबित देयके देण्याचे आश्वासन

कोरपणा : कोरपणा नगरपंचायतीतील सफाई कामगारांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाची अखेर 4 ऑक्टोबर रोजी यशस्वी सांगता झाली. आमदार देवराव भोंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सफाई कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

गेल्या काही दिवसांपासून सफाई कामगार आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत होते. किमान वेतन, वेळेवर व पूर्ण वेतन, पीएफची रक्कम, सुरक्षा साधने, वेतनातील तफावत तसेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कोणत्याही कामगारावर कारवाई होऊ नये, अशा विविध मागण्या कामगारांनी प्रशासनासमोर मांडल्या होत्या.

प्रशासनाकडून मागण्या मान्य

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार—

सफाई कामगारांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून जमा करण्यात येईल.

कामगारांना किमान वेतनानुसार वेतन अदा करण्यात येईल.

कामगारांना आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधने लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील.

आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कोणत्याही सफाई कामगाराच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

कामगारांची पीएफची रक्कम दर महिन्याला भरण्यात येईल.

वेतनातील असलेली तफावत/प्रलंबित रक्कम लवकरात लवकर अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

सफाई कामगारांच्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.

त्यामुळे अनेक दिवसांपासून वेतन व विविध सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या सफाई कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही ऐरणीवर

दरम्यान, आंदोलनाच्या काळात कामगारांनी कचरा व्यवस्थापनातील कथित अनियमितता, सफाई कामगारांचे शोषण व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही केली होती. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रश्नांचीही गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“लेखी आश्वासनाची अंमलबजावणी हाच आता खरा प्रश्न”

आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन प्रत्यक्षात कितपत आणि किती लवकर पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फक्त कागदावरील आश्वासन न राहता कामगारांच्या खात्यात पूर्ण वेतन, पीएफची रक्कम व वेतनातील तफावत जमा होणे, तसेच सुरक्षा साधने प्रत्यक्ष उपलब्ध होणे गरजेचे आहे.

सफाई कामगारांच्या संघर्षामुळे प्रशासनाला अखेर सकारात्मक भूमिका घ्यावी लागली असून, “एकजुटीच्या संघर्षाचा विजय” अशी भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.

यावेळी मुख्याधिकारी राम रावते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार, आबिद अली, किशोर बावणे, अरुण डोहे, अमोल आसेकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य मथळा

“चार दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासन झुकले; सफाई कामगारांच्या मागण्यांना लेखी मंजुरी! अखेर मिळाली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये