ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाळी धान पीक करपले ; शेतकरी हवालदिल

दिवाळी अंधारात जाण्याची भीती ; शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : तालुक्यात यंदाच्या पावसाळी हंगामात वातावरणातील बदल, कमी पाऊस व विविध रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये धानाचे पीक करपल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु कमी पावसा मुडे , पिकाच्या वाढीच्या काळात प्रतिकूल तलावं कोरडे पडले व हवामानाचा परिणाम झाला. धानावर कडा करपा, खोडकीड यांसह विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले. औषध फवारणी करूनही अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.

पीक हातातून गेल्याने लागवड, खते, औषधे, मजुरी यासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, पीक नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाकडून मदत मिळाल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित केले जाते का आणि शासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणता निर्णय घेते, याकडे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये