ताज्या घडामोडी

हिंगणघाट शहरात वाहतुक नियमनासंबधाने कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १६/८/२०२६ रोजी पासुन हिंगणघाट शहरात वाहतुक नियमनासंबधाने मोहीम राबविण्यात येत असुन, मोहीमेदरम्यान खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.

०१. वाहुतक नियमांचे उल्लंघन करणरे इसमांवर शहरातील नंदोरी चौक, नांदगाव चौक, कलोडे चौक, कारंजा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रुबा चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, मनसे चौक व इतर महत्वाचे चौकात खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असुन सदरची मोहीत निरंतर सुरु आहे.

०२. सदर मोहीमेदरम्यान दिनांक १८/०८/२०२६ ते दिनांक ०४/१०/२०२६ पावेतो वरीलप्रमाणे शहरातील विविध चौकात तसेच महत्वाचे ठिकाणी वाहतुक नियमनासंबधाने सुमारे १६,००० मोटर सायकल तसेच इतर वाहने चेक करुन वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे २६४९ वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करुन ३९,१२,४५०/रु चा दंड आकारण्यात आला आहे.

०३. शहरातील वाहतुक नियमनासंबधाने मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात झालेल्या सभेतील निर्देशनानुसार नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, NHIT कन्स्ट्रक्शन कंपनी ह्या विभागांना समन्वयाकरीता पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.

०४. पोलीस विभागाकडुन शहरातील वेगवेगळ्या मुख्य चौकात नाकाबंदी करुन वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणारे इसमांवरील कार्यवाही सोबतच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शहारातील व्यापारी संघटना, शाळा, कॉलेजस तसेच कोर्चीग क्लासेस संघटना यांच्या बैठका घेवुन वाहतुक नियमनासंबंधाने जनजागृती करण्यात येत आहे.

वर्धा पोलीस दलातर्फे सर्व नागरीकांना अवाहान करण्यात येत आहे की, आपण वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच आपले कुटूंबीयाना देखील वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रोत्साहीत करावे. तसेच आपले अल्पवयीन पाल्यांना नियमबाह्य वाहन चालविण्यास देऊ नये.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये