ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. आष्टी अप.क्र. 104/2026 कलम 305 (ड) बिएनएस मदील आरोपीस 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

विद्यमान मा.श्रीमती प्रियंका अ.पटले, प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी, आष्टी जि. वर्धा यांनी ठोठावली शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अप क्र. 104/2026 कलम 305 (ड) बिएनएस मध्ये आरोपी गोपाल मोहनराव युवनाथे, वय 42 वर्ष रा. पांढरघाटी ता वरूड जि. अमरावती याला खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेचा तपशिल –

1) कलम 305/26 कलम 305 (ड) बी.एन.एस. मध्ये 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील-

दि.18/03/2026 रोजी चे दुपारी 03-00 वा. चे सुमारास फिर्यादी सुभाष देशमुख रा. लहान आर्वी ता. आष्टी जि. वर्धा हे गुडी पाडवा सना निमित्य गिरी महाराज यांचे मुलीला नविन कपडे परीधान करावयाचे असल्याने टेलरकडे कपड्याचे माप देण्याकरीता गेले तेव्हा मौजा लहान आर्वी ता. आष्टी जि. वर्धा श्री गजानन महाराज यांचे मुर्तीवरील चांदी सारखे धातुचे छत्र कडासह होते. परंतु ते रात्री 08/30 वा.चे दरम्यान मंदिरामध्ये परत आले. तेव्हा त्यांना ते छत्र दिसले नाही. त्यांनी च्याचा शोध घेतला परंतु छत्र मिळुन न आल्याने त्यांनी पो.स्टे. आष्टी येथे येवुन देवस्थान ट्रष्टच्या संमती शिवाय कोणोतरी अज्ञात चोराने कळस चोरुन नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. आष्टी अप.क्र. 104/26 कलम 305(ड) बी.एन.एस.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हाचा तपास पो. उपनि. निलेश रामदास भिलावे यांनी करुन मा. कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. व्हि.जी. पराते यांनी संपुर्ण कामकाज पाहिले व त्यांना पो.अं. वैभव गावंडे यांनी साक्षदारा यांनी मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करुन मौलाची कामगिरी बजावली आहे. तसेच तत्कालीन ठाणेदार पो.स्टे. आष्टी सपोनी राजेश जोशी यानी साक्षदारांना वेळोवेळी ब्रिफींग करुन योग्य मार्गदर्शन केले. विद्यमान मा.श्रीमती प्रियंका अ. पटेल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आष्टी जि. वर्धा यांनी गुन्हातील फिर्यादी व साक्षीदार तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष तपासुन व उपलब्ध पुरावे या वरुन गुन्हातील आरोपी यास कलम 305 (ड) बी.एन.एस. मध्ये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनालेली आहे.

देविदास गजरे (पोलीस निरीक्षक) पोलीस स्टेशन आष्टी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये