ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वांगीण विकासासाठी जनतेची भाजपात इनकमिंग – आमदार देवराव भोंगळे

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेला खिंडार ; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा जाहीर पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून विकासाला गती देण्यासाठी भाजपा सरकार नेहमी प्रयत्नशील असून सर्वांगीण विकासासाठी जनतेची भाजपात इनकमिंग सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे काल (दि.४) कार्यकर्ता मेळावा आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरू आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही, यावेळी आमदार भोंगळे यांनी दिली.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये नारंडा येथील माजी ग्रा. पं. सदस्य मारोती पोटदुखे, माजी सरपंच राजू खाडे, बंडू बोढे, कालिफनाथ लांडगे, सुनील खोके, दादाजी तिखट, भाऊजी पोटदुखे, सुदाम मालेकर, विजय पोटदुखे, विलास पोटदुखे, रवींद्र पोटदुखे, पद्माकर आत्राम, पंढरी निमकर, धनराज कोंगरे, मारोती कारेकर, गजानन तिखट, संजय बोढे, विजय बोढे, विकास सिडाम, बालाजी कोडापे, बंडू सिडाम, सुरेश आत्राम, संजय तलांडे, प्रवीण आत्राम, पांडुरंग कोडापे, महादेव टेकाम, अनिल आत्राम, उड्डाण कुमरे, राजू हलके , अजय सिडाम,मंगेश कुमरे, लक्ष्मण कोडापे, रमेश मडावी, विकास आत्राम, प्रवीण गोहोकर, रामदास कुमरे, रमेश मडावी, नानाजी आत्राम, रमेश आत्राम, गणपत कुमरे, कवडू कुमरे, मारोती कांबळे, सुभाष मडावी, वैभव मडावी, रुपेश नैताम, ऋतिक खाडे, वेदांत कारेकर, ऋग्वेद नीरे , शुभम आगलावे, चेतन गाडगे, शंकर पेटकर, प्रमोद लोहे, अंबादास मोहुर्ले, प्रभाकर चिंचोलकर, रामचंद्र गुरनुले, रामकृष्ण सुकलवार, तुकाराम वांढरे, पद्माकर आत्राम, सुभाष तिखट, राजू गोहोकर, अशोक करमणकर, रमेश काकडे, शंकर कारेकर, कवडू झाडे, रतन आदे, विजय आत्राम, वैभव उपासे, लक्ष्मण आत्राम, भगवान आत्राम, देविदास मडावी, रामदास नैताम, सुभाष मडावी, रमेश आत्राम, रूपचंद चौधरी, गजानन चहाणकर, अनिल आत्राम, कवडू कुमरे, बापूराव आत्राम, गणेश कावळे, अक्षय गोहोकर शुभम सहारे यांचा समावेश आहे.

आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश करीत असल्याची भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री अरुण रागीट, सरपंच अनुताई ताजने, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, उपसरपंच बाळा पावडे, वसंतराव ताजने, गडचांदूर न. प. नगरसेवक सतीश बेतावार, मोरेश्वर आस्वले, निमणीचे सरपंच अतुल धोटे, अशोक झाडे, शशिकांत आडकिने, अविनाश वाभीटकर, संजय पिंपळशेंडे, नैनेश आत्राम, दिलीप पाचभाई, सचिन बोंडे, नागोबा उरकुडे, सुरेश परसूटकर, महादेव खाडे, राजू खाडे, बंडू बोढे, निखिल भोंगळे, सचिन आस्वले, विशाल अहिरकर, मंजुषा ताजने, रुपाली भोंगळे यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये