ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक खूनखार आरोपीला वर्धा पोलीसांनी घेतले ताब्यात

पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने केलेली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 2/10/2026 रोजी 6.30 ते 07 वाजताच्या दरम्यान फिर्यादी नामे पोलीस हवालदार सुहास सुरेशराव चांदोरे वय 40 वर्ष कार्यरत पोलीस स्टेशन वर्धा शहर यांना गुप्त वार्ताहाराकडून माहिती मिळाली की आरोपी नामे सुरज उर्फ सोनू चंद्रमणी शंभरकर वय 35 वर्ष राहणार वैशाली बुद्ध विहार समतानगर वर्धा हा पांढ-या रंगाची बर्गमन मोपेड दुचाकी गाडी क्रमांक एम. एच. 32/ऐ.क्यू /4799 घेऊन येत आहे आणि त्यांच्या सोबत एक गुलाबी रंगाची मुठ असलेल्या धारधार व टोकदार चाकू घेऊन निघ्यालेला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी डी बी पथकाचे पोलीस हवालदार सुहास चांदोरे व त्यांचे पथक आणि दोन पंच्यासोबत पंच नामे (1)विजय मोहनराव माहुले वय 30 वर्ष राहणार स्टेशनफैल वर्धा पंच नंबर (2) प्रथम किशोर फूसाटे वय 23 वर्ष राहणार समतानगर सांवगी मेघे वर्धा यांना सोबत घेऊन रवाना करण्यात आले आणि आरोपीला अनिकेत काॅलेज ऑफ सोशल वर्क समोर स्टेशनफैल वर्धा येथे अडविले असताना त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे दुकाची वाहनामध्ये एक गुलाबी मुठ असलेला धारधार व टोकदार चाकू मिळून आल्याने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे फिर्यादी नामे सुहास सुरेशराव चांदोरे वय 40 वर्ष राहणार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल केला अपराध क्रमांक 1623/2026 कलम 4,25 शस्त्र अधिनियम सहकलम 3(1) 181.130/177 मोटार वाहन कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम दाखल करण्यात आली असून एक पांढ-या रंगाची सुझुकी बर्गमन कंपनीची मोपेड दुचाकी वाहन क्रमांक एम. एच. 32- ऐ क्यू./4799 किंमत 1.00.800 -रुपये आणि एक गुलाबी मुठ असलेला धारधार व टोकदार चाकू किमंत 800/-रुपये हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक वर्धा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन शहरचे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुहास चांदोरे, पोलीस हवालदार सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार मनोज काकपुरे, पोलीस अंमलदार नवनित वानखेडे, पोलीस अंमलदार उमेश कुंभरे पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस हवालदार सचिन केशवराव भारशंकर पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये