अवैध रेती वाहतुकीविरुद्ध देवळी पोलिसांची धडक कारवाई
(दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण 14 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी, जि. वर्धा रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशन देवळीच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असूनए दिनांक 04 ऑक्टोबर 2026 रोजी देवळी पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करून दोन ट्रॅक्टर ट्रॉली व रेती असा एकूण 14 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत दिघी ते देवळी रोडवर पहाटेच्या सुमारास आरोपी मयूर भास्करराव मोहेकर वय 27 वर्षे, रा.वार्ड क्र. 3. देवळी, जि वर्धा हा शासनाचा कोणताही परवाना न घेता आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आलाण् त्याच्याकडून एक ब्रास काळी ओलसर रेती किंमत 7,०००/-रू लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत ६,००,०००/- रू व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमत १,००,०००/- रू असा एकूण ७,००,०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन देवळी येथे अप.क्र. 758/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत त्याच मार्गावर मंगेश विजयराव तायवाडे वय 33 वर्षे रा. वार्ड क्र. 10, देवळी जि, वर्धा हा शासनाचा आवश्यक परवाना न घेता ट्रॅक्टर ट्रॉलीमधून रेतीची अवैध वाहतूक करताना मिळून आलाण त्याच्याकडून एक ब्रास काळी ओलसर रेती किंमत 7,०००/- रू लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत ६,००,०००/- रू व लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमत १,००,०००/- रू असा एकूण ७,००,०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाण् याप्रकरणी अप.क्र. 759/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये कलम 303 (2) बीएनएस कलम 48; 8 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली असूनए दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. (वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई)
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभकुमार अग्रवाल (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, डॉ. वंदना कारखिले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळीचे ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलीण
सदर कारवाईमध्ये पोलीस हवालदार अमोल आलवाळकर, पोलीस हवालदार श्याम गावनेर तसेच पोलीस अंमलदार संतोष गिते व आकाश कसार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून, शासनाचा महसूल बुडवून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ठाणेदार पो. स्टे, देवळी, जि. वर्धा



