ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

विविध उपक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने व अभिवादनाने झाली. या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये समाजसुधारकांच्या वेशभूषेत संवाद स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोर समाजसुधारकांची रूपे साकारून त्यांचे विचार संवादाच्या माध्यमातून मांडले. तसेच शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत शालेय परिसर, वर्गखोल्या व क्रीडांगणाची स्वच्छता करण्यात आली.

हा संपूर्ण कार्यक्रम शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन*

 वर्ग सातवीची विद्यार्थिनी आस्था सुभाष मालेकर आणि वर्ग आठवीची विद्यार्थिनी गुंजन पांडुरंग धुळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार वर्ग सातवीची विद्यार्थिनी स्वरा कlare हिने मानले. कार्यक्रमाचा समारोप सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला. शाळा व्यवस्थापन व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये