ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात सिताराम पिंपळशेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे शिपाई पदावर प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री. सिताराम लटारी पिंपळशेंडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे अध्यक्ष आनंदराव आडबाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर, सचिव नामदेव बोबडे, सहसचिव विनायक उरकुडे, संचालक माधव मंदे, संचालिका नलिनी डोहे, संचालिका उज्ज्वला चांदेकर, सौ सुजाता पिंपळशेंडे मुख्याध्यापक संजय गाडगे, मुख्याध्यापक राजेश मांढरे, डॉ. संजयकुमार सिंग व पर्यवेक्षक तिरुपती बामणे प्रा दिनकर झाडे वरिष्ठ लिपिक लीलाधर मते शशिकांत चन्ने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष आनंदराव आडबाले यांनी पिंपळशेंडे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांच्या योगदानाचा गौरव केला. प्रमुख पाहुण्यांनीही त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा व कर्तव्यनिष्ठेचा उल्लेख करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन प्रा. राजेश बोडे सर यांनी केले, तर आभार जीवन आडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये