ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दोन्ही महान विभूतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय गाडगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक श्री. तिरुपती बामणे उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. दिनकर झाडे तसेच विद्यालयीन शिक्षक श्री. गजानन बोबडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि शांततेचा संदेश देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, तसेच लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवला, याबाबत उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जहिर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. उमरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही महान विभूतींच्या कार्य व विचारांना उजाळा देत कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये