ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिपाली आणि अंजली राठोड यांची दिल्ली येथे बाल संसदेसाठी निवड-सर्वत्र अभिनंदन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नागपूर :_ दीक्षाभूमी, नागपूर येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या राठोड भगिनी — दिपाली आणि अंजली राठोड — यांची राष्ट्रीय पर्यावरण बाल संसद (RPBS) 2026, दिल्लीसाठी निवड झाली आहे. संपूर्ण विदर्भातून निवड झालेल्या त्या एकमेव दोन विद्यार्थिनी असून, महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ पाच विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. दोघींनाही दिल्ली विधानसभेत आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

मानव रचना इंटरनॅशनल स्कूल आणि पर्यावरण गतिविधी यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित उपक्रमासाठी देशभरातून 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातून पुढील टप्प्यासाठी 95 प्रतिनिधींची निवड करण्यात आली त्यात दिपाली आणि अंजली यांनी अनुक्रमे कॅबिनेट मंत्रालय आणि विरोधी पक्षाची भूमिका सांभाळत आपली क्षमता सिद्ध केली असून, निवडक 68 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून 7 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली विधानसभेत आपले विचार व्यक्त करणार आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पन्हेकर तसेच शिक्षकांनी कु. दिपाली व कु.अंजली श्रीपत राठोड यादोन्ही भगिनींचे अभिनंदन व कौतुक केले. दिल्ली संसदेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये