तळागाळातील सामान्य कार्यकर्ता हीच भाजपाची ऊर्जा – आमदार देवराव भोंगळे
कोरपना तालुक्यातील वडगांव येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांचे आणि कार्यकर्त्यांचे एक कुटुंब आहे. या पक्षाची खरी ताकद ही तळागाळात अहोरात्र राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. तळागाळातील हाच निष्ठावंत आणि परिश्रम घेणारा कार्यकर्ता हीच भाजपची खरी ऊर्जा आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील वडगांव येथे काल (दि.२) काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.
आमदार देवराव भोंगळे बोलतांना पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासकामांचा धडाका सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. पक्षाची सर्वसमावेशक धोरणे आणि गतिमान विकासकामांमुळेच आज सर्वसामान्य नागरिक मोठ्या विश्वासाने भाजपकडे येत आहेत, असेही आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले.
यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.
यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये साहिल पाचभाई, प्रफुल जीवतोडे, प्रशांत मालेकर, आशिष गोहोकर, वैभव आंबेकर, श्रीराम पाचभाई, नरेश राजुरकर, प्रकाश भोंगळे, कार्तिक भोंगळे, श्रीकांत पाचभाई, प्रदीप आंबेकर, ज्ञानेश्वर वडस्कर, सुरज नांदे, विठ्ठल जांभेकर, वैभव गोहोकर, मारोती उरकुडे, नंदकिशोर भोंगळे, गजानन भोंगळे, शशिकांत देवाळकर, भास्कर निखाडे, चंद्रकांत कोलांडे, पांडुरंग मडावी, सतीश भोंगळे, घनश्याम भोंगळे, गोविंदा भोंगळे, विनोद गोहोकर, महेंद्र गोहोकर, चेतन आंबेकर, एकनाथ पाचभाई, विठ्ठल निंदेकर, मारोती भोंगळे यांचा समावेश आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात विकासकामांचा धडाका सुरू असून आम्ही विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश करीत असल्याची भावना यावेळी नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, पद्माकर मडावी, अशोक झाडे, निखिल भोंगळे, रवी बंडीवार, निमणी येथील सरपंच अतुल धोटे, सतीश जमदाडे, अरुण गोहोकर, रामदास जोगी, रामदास पारखी, श्रीकृष्ण डवरे, शंकर पिंगे, प्रशांत पाचभाई, प्रफुल जीवतोडे, मुकेश निमकर, सचिन आस्वले, विशाल अहिरकर, शैला गोहोकर यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



