ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

12 तासात घरफोडीतील दोन आरोपीतांना बेड्या ठोकुन 185,550/-रु. चा मुद्देमाल जप्त

सेलू पोलीसांची डी. बी. पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 02/10/2026 रोजी फिर्यादी नामे सौ. छाया विलास तडस रा. केळझर ता.सेलू जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे फिर्याद दिली की, त्यांच्या केळझर येथील दिनांक 01/10/2026 रोजी दिवसा राहत्या घराचे लोखंडी कपाटचे लॉक तोडुन कोणतरी अज्ञात चोरट्याने कपटाचे लॉकर मध्ये ठेवुन असलेले फिर्यादी यांची सोन्याची पोत ज्यामध्ये सोन्याचे मनी व एक सोन्याचे पदक अंदाजे किमंत 54,000/-रु. व नगदी 2000/-रु. असे सोन्याचे दागिने व पैसे चोरुन नेल्याबाबत पोलीस स्टेशन सेलू येथे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन सेलू येथील डि.बी. पथक पो.हवा. अनिल केकतपुरे ब.क्र.323 हे करीत असताना गोपनीय साक्षीदार यांच्याकडुन माहीती प्राप्त करुन त्यांनी व त्यांच्या डि.बी. पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) रोशन संजयराव बोरेकर वय 26 वर्ष 2) अभिनव किसनाजी देव्हारे दोन्ही रा. वार्ड क्र. 4 केळझर ता. सेलू जि. वर्धा यांना 12 तासाचे आत अटक करुन त्यांनी गुन्हा करण्याकरीता वापरली 1) एक काळ्या रंगाची जुनी वापरती हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रमाक एम.एच.-32-ए डब्यु-2820 2) एक जुना वापरता REDMI 5G कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल फोन 3) एक जुना वापरता Redmi कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल फोन 4) तसेच गुन्ह्यात चोरलेले पैसे 2000/-रु. 5) 56 सोन्याचे मनी वजन 1.960 ग्राम व एक सोन्याचे पदक वजन 3.090 ग्राम असा एकुण जुमला किमंत 185,550/-रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर डि.बी. पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल रिकव्हर करुन सदरचा गुन्हा 12 तासाचे आत उघडकीस आणलेला आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा, मा.श्री सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा.श्री. प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू, पोउपनि विशाल नल्लावार व गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे, ओमप्रकाश तल्लारी, लोकेश पवनकर यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये