राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमीत्याने ” अंमली पदार्थ विरोधी जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन
नागरीकांना/विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासुन दुर राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमीत्य आज दिनांक ०२/१०/२०२६ रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद वर्धा, सहायक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, वर्धा येथे सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उपस्थितांना अंमली पदार्थ संबंधाने जनजागृती करणे करीता विशेष अतिथी तसेच मुख्य वक्ते म्हणून श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना अंमली पदार्थ संवधाने जनजागृती करण्यात आली.
“Drugs Free Wardha”, संकल्पनेवर आधारित सुरक्षित भविष्याची दिशा आणि नशामुक्त समाज घडविण्याकरीता वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून तयार करण्यात आलेल्या NDPS Awareness video चे सादरीकरण करण्यात आले तसेच PPT presentation दाखवून अंमली पदार्थाचे दुष्परिणाबाबत माहीती देण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी यांनी कार्यक्रमात सहभागी उपस्थितांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक “राष्ट्रगीत “घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नशा सोडा, जीवन जोडा, सुसंस्कृत समाज घडवूया, नशामुक्त वर्धा घडवूया असा महत्त्वपुर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आले. वर्धा शहराला प्रगत, सुरक्षित व सशक्त बनवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनापासुन दूर राहावे असे आवाहन वर्धा पोलीसांतर्फे करण्यात आले.
सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच जिल्हा परिषद, वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच विवीध विभागातील अधिकारी तसेच नशामुक्ती संस्थेचे अध्यक्ष व शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



