सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेअंतर्गत आज यशवंत शाळा, देवळी येथे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट लिंक व संदेशांपासून सावध राहणे, ओटीपी, पासवर्ड व बैंक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही न देणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेले फोन, संदेश, ई-मेल किंवा लिंक यांना प्रतिसाद देऊ नये. कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1860 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहून आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती द्यावी, असे सांगण्यात आले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



