ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतुकिच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांन्वये कारवाई

वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत असुन आज दिनांक 02/10/2026 रोजी आर्वी शहरात जीवन सुरक्षा अभियान ठाणेदार पोस्टे आर्वी सतिश डेहनकर व वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, पोउपनी लगड व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन आर्वी येथील अधिकारी व अंमलदार, वाहतुक अंमलदार यांनी आर्वी शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करण्यात आलेल्या वाहनांवर तसेच विना परवाना वाहन चालविणारे वाहन चालक, ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन, परवाना न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहनांवर राबविण्यात आले व वाहतुकिच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर एकुण 237 चलान केसेस मोटार वाहन कायद्यान्वये करण्यात आल्या असुन 3,45,500/रु चा दंड करण्यात आलेला आहे.

तसेच पोलीस स्टेशन आर्वी व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे वतीने आर्वी शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात आले.

विशेषतः

– 1) वाहतुकीच्या मार्गावर वाहने उभी करु नये.

2) सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणी वाहने अनधिकृत पाकींग करु नये.

3) पार्कीगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत.

4) अल्पवयीन मुला मुलींना वाहने चालविण्यास देऊ नये

5) विना परवाना वाहन चालवु नये.

6) महामार्गावर दुचाकी वाहने चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.

7) चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा.

8) ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन चालवु नये.

सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंड वसुल करण्याचा नसुन वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असुन नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. लहान मुलांकडून विनापरवाना वाहन चालवुन घडत असलेले अपघात व त्यामुळे त्यांचे भविष्यावर होणारे वाईट परीणामांपासुन त्यांचे संरक्षण व नागरीकांचे जिवीताचे संरक्षण हा प्रमुख उद्देश्य जीवन सुरक्षा अभियानाचा आहे.

यापुढेही सदर जीवन सुरक्षा अभियान सर्व जिल्हाभर प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करावे.

Disay (विजय कुमार घुले) स.पो.नि/वा.नि.शा.वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये