देवळी पोलीसांची कार्यवाही
घरातील चोरी प्रकरणातील आरोपी 24 तासात निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मौजा सिरसगाव (धनाडे) येथे राहणारे हर्षल प्रभाकरराव राउत व्य 37 वर्ष यांनी पोलीस स्टेशन देवळी येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची आई सुरेखा राउत यांचे मंगळसुत्र घरी कम्पुटर टेबलचे ड्रावर मध्ये काढुन ठेवले असता कोनीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करुन कम्पुटर टेबलचे ड्रावर मध्ये ठेवुन असलेले मंगळसुत्र की 35,000/- रु चे चोरुन नेले आहे. अश्या तक्रारदाराचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान देवळी पोलीसांना माहीत पडले की, एक महीला तक्रारदार यांचे घरी नेहमी येणे जाणे करत होती. अशा माहीती वरुन तिला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तीने सांगीतले की, मीच मंगळसुत्र चोरुन नेले अशी गाव्ही दिल्याने चोरीस गेलेले मंगळसुत्र सदर महिले कडुन जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल सा (भापोसे), मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. सदाशिव वाघमारे सा, मा. सहा. पोलीस अधिक्षक, डॉ वंदना कारखेले, उपविभागीय पो.अ. उपविभाग पुलगाव, यांचे मार्गदर्शनाखाली मा. ठाणेदार सपोनि संदीप कापडे, यांचे सह पो.हवा. अमोल आलवाडकर ब. न 1470, पो. हवा श्याम गावनेर ब न. 1493, पो. शि. संतोष गिते ब न 1711, पो. शि. आकाश कसर ब न 965 यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा अमोल आलवाडकर ब न 1470 हे करीत आहे.



